खान्देशाचा वीर सुपुत्र चेतन चौधरी मातृभूमीसाठी शहीद
खान्देशातील सपूत चेतन चौधरी यांचे मातृभूमीसाठी बलिदान
🇮🇳 भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳
मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेल्या 37Bn BSF च्या तुकडीवर काळाने घाला घातला. 11 मार्च 2025 रोजी 11 जवान ड्युटीवरून परतत असताना त्यांची गाडी खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत 3 जवान जागीच शहीद झाले, तर उर्वरित जवान गंभीर जखमी झाले. इम्फाळ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

याच दुर्घटनेत महाराष्ट्रातील चोपडा शहराचे वीर सुपुत्र चेतन चौधरी हेही गंभीर जखमी झाले होते. प्राणपणाने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 15 मार्च 2025 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मातृभूमीसाठी बलिदान दिले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण राष्ट्राचा सलाम!
चोपडा तालुक्यातील सर्व रक्षक व नागरिकांनी त्यांच्या अंतिम संस्कार विधीत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम यात्रेची वेळ आणि स्थळ लवकरच जाहीर केले जाईल.
🇮🇳 शहीद जवान चेतन चौधरी अमर रहे! 🇮🇳
