साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान
दि. 13 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कलावंत विचार मंच आणि कमल फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
स्वागताध्यक्ष सुनीलजी मोंढे, सिनेमा दिग्दर्शक अनिलकुमार साळवे, प्राचार्य डॉ. दिपाली सोसे, प्रा. सोमनाथ मुठाळ, आणि श्री सतीश खरात यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
शैलजा करोडे यांनी आपल्या साहित्य प्रवासात २२ पुस्तकं प्रकाशित केली आहेत, ज्यामध्ये कविता, कथा, कादंबरी, चारोळ्या, भक्तीगीत, आणि ललितलेखनांचा समावेश आहे. त्यांच्या या साहित्यसंपदेला विविध स्तरांतून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, त्यांच्या या सन्मानामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
या पुरस्कारामुळे त्यांच्या सृजनशीलतेला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
