शिरपूर विधानसभा सौ गितांजली कोळींचा समाजासाठी लढा

शिरपूर विधानसभा सौ गितांजली कोळींचा समाजासाठी लढा

शिरपूर ०९ विधानसभा २०२४: सौ. गितांजली कोळींचा समाजासाठी लढा 

राखीव मतदार संघातील रणरागिणी 
शिरपूर ०९ विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत राखीव मतदार संघातून सौ. गितांजली कोळी या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रस्थापित शक्तींना न जुमानता, त्यांनी मनी पावर आणि मसल पावरच्या खेळात उतरून समाजासाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. 

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा – Khandesh Vahini News

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा
अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा



समाजासाठी समर्पित जीवन 
सौ. गितांजली कोळी यांनी समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला झोकून दिले आहे. 
– दारूमुक्तीचा लढा उभारून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. 
– गावागावात जाऊन महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत संघर्ष केला आहे. 
– कोरोना महामारीच्या काळात अन्न-धान्य, औषधे, सुरक्षा साहित्य, आणि अंत्यविधीपर्यंत लोकांच्या मदतीसाठी त्या रस्त्यावर उतरल्या. 

आरक्षणासाठी ऐतिहासिक उपोषण 
समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले. 
– पहिले उपोषण १८ दिवसांचे, 
– दुसरे उपोषण १४ दिवसांचे. 
तळागाळातील समाजासाठी सतत संघर्ष करणाऱ्या या रणरागिणीने महाराष्ट्रभर समाजजागृती दौरा केला आहे. 

सामाजिक कार्याचे यशस्वी उदाहरण 
सौ. गितांजली कोळी यांनी अनेक सामाजिक मान्यवरांचा सन्मान करून समाजासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यांनी अनेकांना एकत्र आणून सामाजिक बदलाची चळवळ उभारली आहे. 

मतदानाचा हक्क: एक परिवर्तनाची सुरुवात 
२० नोव्हेंबर २०२४ रोजी *सौ. गितांजली कोळी* यांना आपले अमूल्य मत द्या आणि पिचलेल्या, तळागाळातील समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी त्यांना पाठवा. 

खान्देश हित संग्राम