खांदेशातील काही अद्भुत गाव कनाशी आणि अक्कडसे
खांदेशातील काही अद्भुत गाव!
कनाशी आणि अक्कडसे!
लेखक-बापू हटकर
जगात, देशात आणि राज्यतही अद्भुत चमत्कारीक अनेक गाव आहेत. ते आपल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चमत्कारामुळे प्रसिद्ध आहेत. उदा जगन्नाथपुरी येथिल मंदिरावरील ध्वज हां हवेच्या विरुद्ध दिशेला फडकत राहतो. अहमदनगर जिल्ह्यात शनी शिंगाणापूर या गावातील दारावर कडी कुलपं नसतात तरी तिथं चोरी होतं नाही. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे एक गोमूख आहे. हे गोमूख एरव्ही कोरडे असतें. दर तीन वर्षानी त्यातून भर उन्हाळ्यात मे महिन्यान पाण्याची धार वहायला लागते. ती पावसाळा सुरु झाल्यावर आटते. ती पुढे 3 वर्षाने अवरते तीला राजापुरची गंगा म्हणतात. तिची अख्यायिका अशी आहे कीं, ही राजापुरची गंगा प्रत्येक्ष काशीची गंगा आहे म्हणतात. ती दर तीन वर्षानी भक्तांचा उद्धार करायला राजापूर येथे अवतरते.
अशीच काही चमत्कारीकं आणि अद्भुत गाव खांदेशातही आहेत. पण त्यांना प्रसिद्धी नाही. साक्री तालुक्यात आमळी नावाचे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्यात कन्हैयालाल महाराज याची द्वारकेच्या मंदिरातील श्रीकृष्णाची मूळ मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील अत्यंत सुबक मूर्ती म्हणजे तो शेषशाही विष्णू आहे. लक्ष्मी त्याचे पाय चेपत आहे. नाभीतून कमळ निघालं त्यावर ब्रहदेव विराजमान आहे. या मूर्तीच्या बेंबीतून पाण्याची एक सूक्ष्म धार वर्षभर प्रवाही असतें. ती उन्हाळ्यात आटत नाही कीं, पावसाळ्यात वाढत नाही. या पाण्याचा उगम कुठे आहे ते कोणालाही सांगता येत नाही. हां एक मोठा चमत्कार आहे
भडगाव तालुक्यात एक कनासी नावाचे गाव आहे. या गावात महानूभाव पंथीय कन्हैयालाल महाराजाचे भव्य मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती कृष्णाची नसून चक्रधर स्वामींची आहे. चक्रधर स्वामी हे श्रीकृष्णाचे अवतार असल्यामुळे त्यांना कन्हैयालाल महाराज म्हणतात. या कन्हैयालाल महाराज यांच्या नावावरून गावाच नावं कान्हाश्री आहे. पुढे कान्हाश्री नावाचा अपभ्रश होऊन गावाच नावं कनासी झाले.
या गावातील चमत्कार असा आहे कीं, हे संपूर्ण गाव शाकाहारी आहे. मटण कोंबडी तर सोडा पण या गांवात साधं कोंबडीच अंड सुद्धा मिळत नाही. या गावत आपलेच लोक राहतात. तिथे आपल्या सारख्याच जाती आहेत. या जाती ईतर गावांत त्यांच्याचं जातीत सजातीय सोयरीक करतात. अशा सोईरिकेतून बाहेर गावातून आणलेली मांसाहारी सून कनासी गावात आल्या नंतर मात्र शाकाहारी होते आणि पुढे आयुष्यभर ती मांसाहारालां शिवत सुद्धा नाही.
सिंदखेडे तालुक्यात भूराई (बुराई) आणि तापी नदीच्या संगमावर अक्कडसे गावात एक मातीची समाधी आहे. ती ऊन, वारा, पाऊस आणि महापुरातही नष्ट होतं नाही. हिंदू बांधव हिला गहिनीनाथाची समाधी म्हणतात तर मुस्लिम बांधव हिला गैबानशाह बाबाची कबर म्हणतात.
इथला चमत्कार असा आहे. ही समाधी मातीची असूनही शेकडो वर्ष अबाधित आहे. तीच काहीही नुकसान होतं नाही. समाधी मातीची आहे म्हणून अक्कडसे गावातील गावंकऱ्यांची घरे देखील मातीची आहेत. एखाद्याने चुना किंवा सिमेंटच घर भांदल तर घरातील कोणाचा तरी अकाली मृत्यू होतं. प्रसंगी घर कुटुंब उध्वस्त होतं अशी आख्यायिका आहे.
हां गहिनीनाथ म्हणजे गोरक्षनाथाचा शिष्य होय. गहिनीनाथाचा शिष्य निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथाचा शिष्य ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानदेव, ज्ञानेश्वर माऊली. हां ज्ञानेश्वर वारकरी पंथांचा गुरु.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
ज्ञानियाचा राजा गुरु महाराव!
या ज्ञानोबा महाराजाच्या गुरुचा गुरूं गहिनीनाथ त्याची समाधी अक्कडसे गावात आहे. त्याची जन्म कथा अशी आहे कीं, गहिनीनाथाचा जन्म एका मातीच्या बाहुल्यातून झाला आहे. म्हणून त्याची समाधी आणि अक्कडसे गावांतील घरे मातीची आहेत. हे अद्भुत आहे पण बाहेरील लोकांना ते माहीत नाही. त्याचा प्रचार नाही.
खान्देशांत अशी अजून काही चमत्कारीक स्थळ असतील ती मलाही माहीत नाहीत. ही सर्वं स्थळ लोकांना माहीत झाली, त्यांचा नियोजन बद्ध प्रचार झाला तर खान्देशातील पर्यटन व्यवसाय वाढून लोकांना रोजगार मिळेल. आपला प्रदेश श्रीमंत होईल.
3 thoughts on “खांदेशातील काही अद्भुत गाव कनाशी आणि अक्कडसे”