उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर
पुरस्काराचे मानकरी
अहिराणीतील ज्येष्ठ साहित्यिक श्री कृष्णा पाटील अमळनेर यांना जीवनगौरव पुरस्कार तर डॉ.दा.गो. बोरसे गौरव पुरस्काराचे मानकरी ,सौ लता पवार नाशिक, श्री एम के भामरे शिरपूर ,प्रा . भगवान पाटील, धुळे श्रीमती वनमाला पाटील जालना , समाधान सोनवणे ताडे ता. एरंडोल, रोहित पवार कमखेडा शिंदखेडा हे आहेत.





जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे अहिराणीतील साहित्यिक ,लेखक, कवी, स्तंभलेखक ,विविध डिजिटल माध्यमात कार्यरत मान्यवरांना दरवर्षी अहिराणीच्या सक्षमीकरण ,संवर्धन ,समृद्धीसाठी डॉ .दा.गो.बोरसे पुरस्कार व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीही वरील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक ३० जून २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता नाशिक येथील कालिका मंदिर हॉल जुना आग्रा रोड येथे संपन्न होणार आहे.

तरी अहिराणीतील रसिक, प्रेक्षक. साहित्यिक व भाषा प्रेमी यांना विनम्र आवाहन आपण या सोहळ्यास उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे , काव्य संमेलनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन अध्यक्ष विकास पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील सहकार्याध्यक्ष डॉक्टर एस के पाटील यांनी केले आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे तसेच रिमझिम काव्यसंमेलनाचेअध्यक्षस्थान डॉ. फुला बागुल शिरपूर ज्येष्ठ साहित्यिक हे भूषवणार आहेत .तर उद्घाटक म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एडवोकेट श्री.नितीन ठाकरे, सरचिटणीस महाराष्ट्र मराठा विद्या प्रसारक मंडळ हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे सचिव पत्रकार श्री प्रमोद कुवर यांनी दिली आहे.
1 thought on “उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर”