त्र्यंबकेश्वरी ज्योतिर्लिंग हृदयी वसले
दर्शन!अतिविशाल असतं!ब्रम्हाडं स्वरूप असतं!डोळ्यातून होत असतं!हृदयातून होत असतं!मनच्क्षुतून होत असतं!दर्शन रचनाकाराचं वास्तव रूप असतं!दर्शनानें परमात्म्याचीं भेट होत असतें!दर्शनासाठी हृदयातला हर्ष भक्तीत रूपांतर होत असतो!श्रद्धेला भक्तीस्वरूप आरसा लावायचा असतो!आपण नतमस्तक होत असतो!आत्मा परमात्म्याला शरण जातं असतो तेचं विश्वात्मकाचं दर्शन असतं!
नेत्र कमलातून वास्तव-अस्तित्व दर्शन होत असतं!अतिविशाल स्वरूपाचं दर्शन होत असतं!अनंताचं दर्शन होत असतं!दर्शनानें मंनचक्षु पावन होत असतात!हृदय परमात्म्याजवळ येत असतात!सामान्यजन असामान्यांच दर्शन करून आत्मशांतीचा चिन्मय आनंद घेत असतात!मानवी बुद्धीच्या पलीकडे जे असतं ते दर्शन असतं!चित्त स्थिर होत असतं!सुखानंद मनाची अध्यात्मिक भूक भागवीत असतो!दुःख हलके करीत असतो!आपण आवडत्याच्या साक्षात्कारांने आपला देहभान विसरत असतो!तेचं ब्रह्मांड स्वरूपाचं दर्शन असतं!आज नाशिकजवळ ३५किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर येथे अतिदिव्य स्वरूपाचं दर्शन घेतलं!मानवी मनाच्याही पलीकडे असलेल्या चिरंतन स्वरूपाचं दर्शन झालं!महादेव त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं!प्राचीन अमृत हृदयी घेतलं!संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या पावन भूमीच दर्शन घेतलं!
आज व्याघ्रधारी स्वरूपाचं दर्शन घेतलं!ओंकार स्वरूपाचं दर्शन घेतलं!आज त्रिशूलधारीचं दर्शन घेतलं!डमरू धारीचं दर्शन घेतलं!नागधारीचं दर्शन घेतलं!आज आम्ही नीलकंठधारीचं दर्शन घेतलं!भस्मधारीचं दर्शन घेतलं!आज स्मशानवासीचं दर्शन घेतलं!त्रिनेत्रधारीचं दर्शन घेतलं!आज
जटाधारीचं दर्शन घेतलं!गंगा धारीचं दर्शन घेतलं!आज चंद्रधारीचं दर्शन घेतलं!त्र्यंबकेश्वर येथे साक्षात्कारी महादेवाचं दर्शन घेतलं!भगवान शंकराचं दर्शन घेतलं!अनादी अनंत स्वरूपाचं दर्शन घेतलं!ज्याचीं सुरुवात माहित नाही,शेवटही कळत नाही अशा दिव्य-अनाकलनीय स्वरूपाचं दर्शन घेतलं!भगवान भोलेनाथाचं दर्शन झालं!प्राचीन अप्रतिम कलाशिल्पाचं, कलाकृतीचं,नयन मनोहारी स्वरूपाचं दर्शन झालं!सकाळी १०-००वाजता दर्शन बारीतील रांगेने चालत चालत दुपारी ३-०० महादेवाचं झालं!
हजारो श्रद्धाळू दर्शन बारीतून अनंत स्वरूपाच्या दर्शनासाठी तासनतास उभे होते!चालत होते!ताटकळतं पुढे पुढे सरकत होते!रांग थांबली की बाकड्यावर बसून ज्योतिर्लिंग स्वरूपासं हृदयीं बसवीत होते!काही क्षण डोळे बंद करून चिंतानातं मग्न होते!मानवी मन कसं असतं बघा ना,जे कळलं नाही त्याला शोधण्या हजारो-लाखोंच्या संख्येने मंदिराद्वारी उभे असतो!मनात भावभावनांच्या लाटा उचंबळतं असतात!चंचल मनाला धडका मारीत असतात!मनुष्य जन्म पराधीन आहे!जन्म-मरणाच्या अंतरातं आपलं अस्तित्व शोधित असतो!आपण कोण आहोत याचा शोध सुरु असतो!
अन्न प्राशन करून पोटाची भूक भागवीत अतृप्त मनाच्या भुकेसाठी शोध सुरु असतो!सत्य अनाकलनीय असतं!जीवनार्थ कळत नाही!पाण्यातला मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर जी अवस्था होते तिचं अवस्था मानवी मनाची होते!मन द्विधावस्थेत व्याकुळ होतं असतं!जगण्याचा अर्थ कळतं नाही!मनाला शांती नाही!तृष्णा शांत होतं नसते!अशा वेळेस कोणीतरी दिव्यात्मा, सद्गुणी महापुरुष,योगी वाटाडया भेटत असतो!तें मन शांतीचं भक्तीऔषधं देतात!आधात्माचीं गोडी लावतात!भरकटलेल्या मनास,चंचल मनास श्रद्धेचां लगाम लावून जगण्याचा मार्ग दाखवीत असतात!मन करा रें प्रसन्न म्हणतं जीवनार्थ सांगत असतात!अतृप्ती तृप्तीकडे वाटचाल करू लागते!
आज हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू दर्शन घेत होते!बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं देवस्थान भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत होते!आम्हीही ज्योतिर्लिंगांच दर्शन घेतलं!स्वतःस श्रद्धेच्यां स्वाधीन केलं!दर्शनासं व्याकुळ असलेले डोळे महादेवाच्या पिंडीवर रोखले गेले!मंनंचक्षु मनोभावे उघडले गेले!भक्ती शक्तीतं विलीन झाली होती!श्रद्धा देवगाभाऱ्यात आनंदूनी उड्या मारत फिरत होती!मी मी नव्हतो!मी परमात्म्यात ढवळला जात होतो!मी विरघळत राहिलो!माझं अस्तित्व शिल्लक नव्हतं!भरकटलेला ‘मी’…”त्याचा” दास झालो होतो!माझ्या जीवनांतांपर्यंत दास झालो होतो!डोळे आनंदुनी अश्रू गाळीत होते!मला ज्योतिर्लिंग स्वरूप भेटले होते!मला त्र्यंबकेश्वर भेटले होते!

नानाभाऊ माळी
(.त्र्यंबकेश्वर,नाशिक)
हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-२८ जानेवारी २०२४