उत्तर महाराष्ट्र विभागाची विचित्र रचना

उत्तर महाराष्ट्र विभागाची विचित्र रचना

उत्तर महाराष्ट्र विभागाची विचित्र रचना

प्रशासकीय कारणासाठी महाराष्ट्राचे एकूण सहां विभाग केले आहेत. त्यात पूर्व विदर्भ नागपूर विभाग, पश्चिम विदर्भ अमरावती विभाग, मराठवाडा छ संभाजीनगर विभाग, पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग, कोकण मुंबई विभाग आणि शेवटी उरसूर माल एका गोणीत भरावा तसा उरलेला महाराष्ट्र ज्यात मुख्य भाग खान्देश आहे, तो उत्तर महाराष्ट्र या नावाने एका गोणीत कोंबला आहे. तो अत्यंत विचित्र प्रकार करूनं ठेवला आहे.

उत्तर महाराष्ट्रा साठी जळगाव येथे स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. पण नगर आणि नाशिक जिल्ह्यानी त्यात यायला विरोध केला. ते पुणे विद्यापीठात गेले. जळगाव विद्यापीठात फक्त धुळे, जळगाव आणि नंदुरबार हां मूळ खान्देश राहिला. या विद्यापीठाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ का म्हणावे? हे तर फक्त खान्देश विद्यापीठ आहे.  याचे नावं बहिणाबाई चौधरी खान्देश विद्यापीठ जळगाव असे केले पाहिजे. जनतेनी तशी मागणी केली पाहिजे.

उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र एसएससी आणि एचंएससी बोर्ड आहे. त्यात फक्त नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हे जिल्हे येतात. नगर जिल्हा पुणे बोर्डाला जोडला आहे. नगर जिल्हा पुणे विभागाचाचं भाग आहे. मग जोडून द्या तिकडे.

उच्चं न्यालयांच्या खंड पिठाच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर हे जिल्हे छ संभाजीनगर खंड पिठाला जोडले आहेत आणि नाशिक जिल्हा हां मुंबई उच्चं न्यायालयाला जोडला आहे. अशी विचित्र परिस्थिती ईतर कोणत्याही विभागाची नाही. त्या प्रत्येक विभात, एक विद्यापीठ, एक एसएससी, एचएससी बोर्ड, एक उच्चं न्यालय आहे. त्यांची बोलीभाषा, संस्कृती, खानपान एक आहे. त्यामुळे ते एकसंघ आहेत. त्यांच्या हक्का बाबत ते एकसंघ असतात. कुठे कांय अन्याय झाला की, सर्वं विभाग एक होतो आणि लढा उभारतो. उत्तर महाराष्ट्रात तस होऊ शकत नाही. इथे खान्देशच्या दुःखाचं नगर जिल्ह्याला काही सोयरे सुतक नाही.

उत्तर महाराष्ट्रातील उत्तर नाशिक जिल्हा (कसमादेना), धुळे जळगाव, नंदुरबार जिल्हे, हां सर्वं भाग भाषिक सांस्कृतिक दृष्ट्या एक आहे. पण नगर जिल्हा पं महाराष्ट्राचा भाग आहे. तर दक्षिण नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग हां मराठी भाषिक आहे तर पश्चिम भाग आदिवाशी कोकणी भाषिक आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र नावाच जे कळबोळ तयार केलं आहे ते एकसंघ नाही. त्यांचे प्रश्न समस्या सारख्या नाहीत.

नगर जिल्हा राज्यातील सर्वात जास्त ओलिता खालील जिल्हा आहे तर खान्देश राज्यातील सर्वात जास्त दुष्काळी वं पाण्याची भयंकर आबाळ असणारा तुटीचा प्रदेश आहे. या जिल्ह्यातील लोकांत खान्देश बद्दल सुतराम आपुलकी नाही.

नगर जिल्ह्यात कृषी विद्यापीठ आहे. त्यात खान्देश लगेच सामील झाला पण जळगाव विद्यापीठात नगर सामील झालं नाही. त्यांनी पुणे विद्यापीठ निवडल. तीच गत नाशिक जिल्ह्याची झाली आहे. दक्षिण नाशिक जिल्ह्याला खान्देश बद्दल आपुलकी नाही. त्यांच्या बरोबर उत्तर नाशिक जिल्हा सुद्धा खान्देश असून त्याला ते वेगळा समजतात.

कसमादेना हां खान्देशचा मूळ भाग खान्देश पासून तुटला आहे. नाशिकनें सुद्धा उत्तर मंहाराष्ट्र विद्यापीठात सामील होण्या पेक्षा पुणे विद्यापीठात सामील होणं पसंत केलं. पण खान्देशी माणसाने मात्र कोणतेही आढेवेढे नं घेता नाशिकला आपली विभागीय राजधानी म्हणून स्वीकारली आहे. खुद्द नाशिक शहरात अहिराणी भाषिक बहुसंख्य आहे.

नाशिक शहराला जो विभागीय सरकारी विकास निधी दिला जातो. तो संपूर्ण खान्देशचीं लोकसंख्या गृहीत धरून दिला जातो. त्यामुळे नाशिककरानी खान्देशला आपलं म्हटलं पाहिजे.

विदर्भ, मराठवाडा, कोकण ही जीं नावं आहेत ती आहेत तशीचं ठेवली आहेत. पण खान्देशला उत्तर महाराष्ट्र म्हणत त्याची हजारो वर्षाची खान्देश नावाची ओळख पुसण्याचा हां प्रयत्न आहे.

नाशिक विभागातून नगर बाजूला करून हां खान्देश प्रदेश एक संघ रहावा म्हणून इथे, एक विद्यापीठ, एक न्यायललंय, एक एसएससी, एचएससी बोर्ड केलं पाहिजे. आणि या भागातील समस्या युद्ध पातळीवर सोडविल्या पाहिजेत. खान्देशचे मूळ प्रश्न कांय आहेत ते बघू पुढच्या भागात.

बापू हटकर
 

Leave a Comment