प्रश्न आता प्रजेप्रती

प्रश्न आता प्रजेप्रती
भार अखंड वाहतो
देश माझा हा भारती
भ्रष्टाचार दुष्टाचार
महागाई आणि अती ॥धृ ॥
आम्ही भारताच्या लेकी
नाही भारतात सुखी
जन्म होण्या आधी बळी
जाती अमुच्या हो लेकी॥१॥
अतिवृष्टी पावसाची
कधी करपते सृष्टी
प्रजा होते सदोदित
पदोपदी दु:खी कष्टी ॥२॥
अंधश्रध्द अज्ञानाने
सारी बिघडली डोकी
काय सांगू भारताची
माझ्या बातच अनोखी ॥३॥
जाती पातीतच सारी
विभागली राजनिती
सत्ता कशी नांदणार
प्रश्न आता प्रजेप्रती ॥४॥
–निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
जय भारत जय भारती

Leave a Comment