भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली?

भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली?


बेधडक…रोखठोक…जनसाम्यानाचा पश्न
भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली?

काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय प्रवाशांची पाक अतिरेक्यांनी क्रूर हत्या करून भारताच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला होय! भारताने रात्री पाक व्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करून अनेक मोठ्या अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यात त्यांचा भारतातील अनेक बॉम्ब स्फोटात सहभाग होता. त्यांच्यावर बक्षिसे ठेवली होती.

भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली? 2
Why was there a sudden ceasefire between India and Pakistan?



भारताचा हा जोरदार हल्ला पाहून पाकिस्तान शरणागती पत्करेल अशा माध्यमातून बातम्या प्रसारित झाल्या. पाक ने सुद्धा शेकडो ड्रोन ने भारतावर हल्ला केला पण भारताची अँटी ड्रोन मिसाईल ने वर आकाशात नष्ट केले. त्यांचा प्रभाव पडला नाही.

लाहोर, रावळपिंडी, कराची या महत्त्वाच्या शहरात जाऊन भारताने हल्ले केले. त्यांना यश मिळाले. भारताचे बरेच टार्गेट साध्य झाले. युद्ध रंगात आले असताना तिसऱ्या दिवशी दुपारी बातमी आली की दोघा राष्ट्रांनी युद्ध बंदीस संमती दिली. युद्ध थांबविण्याचे मान्य केले.

पण भारताने आपल्या अटीनुसार युद्ध बंदीस मान्यता दिली. या पुढे जर अतिरेक्यांनी भारतावर हल्ला केला किंवा बॉम्ब स्फोट केले तर तो भारतावरचा हल्ला समजून आम्ही पाकिस्तान वर हल्ला करु ही प्रमुख अट टाकली आहे.

युद्ध बंदी साठी प्रथम पाकिस्तान ने भारताला फोन केला व अमेरिकेला मध्यस्थी करण्यास विनंती केली. यावरून पाकने शरणागती पत्करली हे सिद्ध होते. भारताने केलेली पाकिस्तान ची वाईट अवस्था पाहून येथील काही नेते रडले. काही पळून गेले.

पाकिस्तान दिवाळखोर राष्ट्र म्हणून जगात कुप्रसिद्ध आहे. तेथे जनतेला खाण्यासाठी सुद्धा अन्न मिळत नाही. युद्ध चालू असताना युनोने पाकला हजारो कोटी रुपये कर्ज मंजूर केले. यावरून पाक ची अर्थ व्यवस्था किती वाईट अवस्थेत आहे हे सिद्ध होते.

जर युद्ध चालू राहिले असता दोन्ही राष्ट्रांची दयनीय अवस्था झाली असती. युद्ध मुळे महागाई वाढते, वस्तूंची टंचाई निर्माण होते. राष्ट्राचे उत्पादन कमी होते. राष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईस आली असती.

तसेच तीन वर्षापासून युक्रेन रशियाचे युद्ध चालू आहे. यात युक्रेन देश पूर्ण बेचिराख झाला आहे. रशियाची सुद्धा आर्थिक स्थिती खालावलेली आहे. जर बंदिस नकार दिला असता तर युद्ध लांबले असते. देश प्रगती मध्ये मागे पडला असता.

भारत विश्वात आर्थिक विकासात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. अनेक देशांना मागे टाकत भारताने गेल्या दहा वर्षांत बरीच प्रगती साधली आहे. चीन, पाक व अमेरिका यांना भारताने प्रगती मध्ये पुढे जाऊ नये ही त्यांची तीव्र इच्छा आहे.

कारण भारत सर्वांना प्रगतीमध्ये वरचढ ठरणार आहे ही ह्या देशांना जाणीव आहे. म्हणून युद्धात भारताचे नुकसान होऊन विकास साधणार नाही व मागे पडेल अशी त्यांची इच्छा आहे. या सर्वांचा विचार करून भारताने युद्ध बंदीस संमती दिली आहे.

ह्या युद्धाने जगाला दाखवून दिले की पाक हा अतिरेक्यांचा पाठीराखा आहे, तेथे अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे आहेत. येथूनच जगात आतंकवादी निर्यात होतात. तसेच चीन व तुर्की ने पाकला दिलेली शस्त्रे कुचकामी होती ही सुद्धा सिद्ध झाले.

आता अनेक देशातून भारताकडे शस्त्रांची मागणी होत आहे. वास्तविक पाक हा आतंकवादी देश आहे हे जगजाहीर आहे. तरी युनोने त्वरीत त्याला कर्ज मंजूर केले. ह्या कर्जाचा उपयोग भारताविरुद्ध शस्त्र घेण्यासाठी होईल हे माहीत असताना देखील युनोने त्याला त्वरीत कर्ज मंजूर केले.

याचा अर्थ काही देश डबल गेम खेळत आहे हे सिद्ध होत आहे. बलशाली राष्ट्रांचे युनो वर प्रभुत्व आहे हे पुन्हा सिद्ध झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार युनो चा कारभार चालतो. युद्ध बंदीची खरी निकड होती पाकिस्तानला!

कारण भारताने पहिल्या रात्री आतंकवादी केंद्रे उध्वस्त केली. महत्त्वाच्या शहरावर मिसाईल ने अचूक मारा केला. त्यांची डिफेन्स सिस्टीम पूर्ण नष्ट झाली. यामुळे पाक हतबल झाला. जर युद्ध चालू ठेवले तर देश पूर्ण रसातळाला जाईल याची जाणीव झाली.

भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली? 4
भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली?



त्यांनी अमेरिकेला मध्यस्थी करण्यास विनंती केली. पाकिस्तान मधील अनेक प्रांत फुटीर मार्गावर आहेत. बलुचिस्तान, सिंध, POK यासारखे प्रदेश मध्ये पाक राज्यकर्त्याविरुद्ध असंतोष असून त्यांना स्वतंत्र होण्याची इच्छा आहे.

युद्धात हे प्रांत स्वतंत्र होऊन देशाची छकले होतील या भयगंडाने पाक बिथरून गेला होता. राजकीय, आर्थिक व अंतर्गत असंतोष यामुळे पाकिस्तानात अराजकता निर्माण होण्याची भीती होती म्हणून पाकला युद्ध बंदीची अत्यंत गरजेचे होते.

शेवटी अमेरिकेचे पाय धरले. अमेरिकेने दोन्ही देशांना युद्ध बंदी स्वीकारण्यास विनंती केली. युद्धातून सिद्ध झाले की पाकिस्तानवर अतिरेक्यांचे वर्चस्व असते. राज्यकर्ते त्यांच्या मदतीने राज्य करीत असतात.

अतिरेक्यांच्या जनजामध्ये अनेक राज्यकर्ते, उच्च सैनिक अधिकारी हजर होते. राज्यकर्ते त्यांचा सल्ला घेऊन कारभार करीत असतात. हल्ल्यात मारलेल्या अतिरेक्यांच्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची मदत जाहीर केली.

यावरून पाकिस्तानी राज्यकर्ते अतिरेकेंच्या पाठबळाने सत्तेवर असतात हे सिद्ध झाले. दोघांचे घनिष्ठ संबंध असतात. म्हणून पाकिस्तानला अतिरेक्यांचे नंदनवन, स्वर्ग म्हणतात.

– हेमंत जगदाळे, खान्देश सम्राट संपादक, धुळे