दुसरी काशी प्रकाशा
दुसरी काशी प्रकाशा!
पूर्वार्ध
खांदेशात नंदुरबार जिल्हा ता शहादा इथे प्रकाशा नावाच गाव आहे. ते काशी एवढंच पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ते भारतातील दुसरी काशी आहे. प्रकाशा म्हणजे प्रतीकाशी असा त्याचा अर्थ आहे. प्रतीकाशीचा अपभ्रश प्रकाशा आहे.
या बाबत अशी अख्याइका आहे कीं, एकदा सहा महिन्याची रात्र पडली होती. तेंव्हा काशी म्हणजे वाराणशी आणि प्रकाशा येथील लोकांत एक पैज लागली. शिवतीर्थ उभारण्याची.
काशी वाराणसी येथे गंगा आणि असी नदीचा संगम आहे. तिथून 4 किलोमीटर अंतरावरं गंगा आणि वरुणा नदीचा संगम आहे. वरुणा-गंगा आणि असी-गंगा यांच्या संगमाच्या मध्ये 4 किलोमीटरचा एक भूखंड आहे. तो पृथ्वी वरील सर्वात पवित्र भुभाग आहे अशी मान्यता आहे. म्हणून त्याला काशीखंड ही म्हणतात. या भूमीवर वसलेले गाव म्हणजे काशी. तीला वाराणशी असेही म्हणतात. अरुणा+असी या दोन नद्यातीl भूखंड तो अरुणाअसी असे नावं झाले. त्यातूनहं पुढे वाराणसी हे नावं प्रचलित झाले. याचे मोगलनी बनारस असे नामानंतर केले होते.
इकडे तापी, गोमाई आणि पुलिंदा या त्रिवेणी संगमावर प्रकाशा गाव वसले आहे. काशी शब्दाचा अर्थ चकचकित किंवा प्रकाशमान असा आहे. यां दोनही ठिकाणी अद्भुत प्रकाशमान शिवलिंगाच दर्शन लोकांना झालं.
त्यावेळी 6 महिन्याची रात्र आली आणि काशी प्रकाशा यांच्यात शर्थ लागली. आपण आपापल्या जागी शिवालंय उभारू. शिवाची सर्वं रूपे असलेली मंदिर उभी करू. दिवस उगवायाच्या आत सर्वं मंदिर बांधून तयार झाली पाहिजेत. ज्यांचं काम आधी पूर्ण होईल ती काशी आणि ज्यांचं अपूर्ण राहील ती प्रतीकाशी.
दोघांनी एकाच वेळी बांधकाम सुरु केलं. सूर्योदयापूर्वीच वाराणसीची मंदिर बांधून तयार झाली. वाराणशीत जेवढी मंदिर आहेत तेवढीच शिव मंदिर प्रकाशात आहेत. पण प्रकाशात शेवटचं रत्नेश्वराच मंदिर चौथरा बांधून तयार झाला. आणि राहिलेलं काम पूर्ण व्हायच्या आत सूर्योदय झाला. ठरल्या प्रमाणे वाराणशीचं काम आधी पूर्ण झाल्यामुळे ती काशी झाली आणि प्रकाशा प्रतीकाशी झाली. दोन्ही तीर्थ क्षेत्राचे महत्व सारखच आहे. पण खान्देशी माणसाला स्वतःची अस्मिता नाही. म्हणूनं दक्षिणेत अनेक तीर्थक्षेत्र दक्षिण काशी असल्याचा दावा करतात. पण ते सर्वं चूक आहे. काशी फक्त दोनच एक वाराणसी आणि दुसरी प्रकाशा!
हे सांगण्याचा माझा मुख्य उद्देश कांय आहे ते वाचा पुढच्या अंकात.
बापू हटकर
1 thought on “दुसरी काशी प्रकाशा”