थोडक्यात
अहिराणी साहित्य संमेलन
परिसंवाद, एकपात्री प्रयोगासह विविध कार्यक्रम
धुळ्यात चौथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन 03 मार्च सकाळी ९:०० वाजता संमेलनाचे स्थळ स्वर्गीय प्राचार्य सदाशिवराव माळी साहित्य नगरी विद्यावर्धिनी महाविद्यालय, साक्री रोड, धुळे.
अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभा आयोजित
अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यावर्धिनी महाविद्यालयात स्व. अण्णासाहेब सदाशिवराव माळी साहित्य नगरीत ३ मार्च रोजी राज्यस्तरीय चौथे अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे. सकाळी ९ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. याबाबत परिषदेचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सचिव प्रभाकर शेळके, सुमन महाले आदी उपस्थित होते.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष
प्रा. भगवान पाटील यांनी सांगितले की, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद अध्यक्षस्थान अक्षय भूषविणार आहेत. पाटील तर छाजेड हे या संमेलनात पुरस्कारार्थीचा सन्मान करण्यात येणार असून त्यात डॉ. अरुण साळुंखे, विजय पाटील, कलावती माळी, प्रा. भालचंद्र साळुंखे, सुमन देसले यांचा समावेश आहे.
सत्कार आणि सन्मान
प्रा.सदाशिव माळी यांना मरणोत्तर जीवनगौरव सन्मान दिला जाणार आहे. यावेळी आशा रंधे, डी. डी. पाटील, प्रा. व्ही. के. भदाणे, प्रा. सुनील गायकवाड, प्रा. बी. एन. पाटील, अविनाश पाटील, विश्वास बिरारी, नवोदित साहित्यिक प्रवीण पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
संमेलनाचे स्वरूप
संमेलनात विविध विषयांवर चर्चा केली जाईल. तसेच कथाकथन, परिसंवाद, एकपात्री प्रयोग, काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनासाठी अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभेच्या कार्यकारिणीचे सहकार्य लाभले म्हणून हे चौथे अहिराणी साहित्य संमेलन स्व. अण्णासो सदाशिव माळी साहित्य नगरीत कै. प. पू. ब. ना. कुंभार गुरुजी विचारमंचावर आयोजित करण्यात आले असून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
चौथे अहिराणी साहित्य संमेलन कवी मित्रांना आग्रहाची विनंती
सर्व कवी मित्रांना आग्रहाची विनंती आणि निमंत्रण. चौथे अहिराणी साहित्य संमेलनातील कवी संमेलन हे दुपारी तीन ते साडेचार या वेळेत आहे. या सत्रातसाठी आपल्याला कविता सादर करण्यासाठी सादर आमंत्रित करीत आहोत. कृपया आपण 03 मार्च सकाळी ९:०० वाजता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहावे आणि माय अहिराणी बोली च्या संवर्धनासाठी सहकार्य करावे ही विनंती. मायबोली अहिराणी वर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक मान्यवर कवी साहित्यिक यांना आग्रहाचे निमंत्रण. आपल्या उपस्थितीने आम्हाला प्रेरणा प्रोत्साहन आणि बळ मिळणार आहे तेव्हा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
निमंत्रक
सर्व पदाधिकारी
अहिराणी साहित्य परिषद धुळे
संमेलनाचे स्थळ;स्वर्गीय प्राचार्य सदाशिवराव माळी साहित्य नगरी विद्यावर्धिनी महाविद्यालय, साक्री रोड, धुळे


कान्हदेशी कवीच्या कवीता ऐकण्यासाठी बटन दाबा
अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा


