खान्देश कला रत्न राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण द्या!

राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण द्या!

राम सुतार हे नावं आता देशात सर्वांनां परिचित झालं आहे. अहिर सुतार आहेत तें. गोंदूर ता धुळे येथे एका अहिर सुताराच्या घरात त्यांचा जन्म झाला. जे जे स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाची पदवी घेतलेले राम सुतार आता जगप्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांनी आता पर्यंत महात्मा गांधीचे जगातील सर्वात जास्त पुतळे तयार केले आहेत आणि तें जगभर बसविले आहेत. मं गांधी सोबतच ईतर अनेक थोर पुरुषांचे पुतळेही त्यांनी बनविले आहेत.


           राम सुतार यांनी सर्वात पहिलं काष्ठ(लाकूड) शिल्प गोंदूर गावांत घडवील. तें शिल्प म्हणजे लाकडातून गौरांई घडविली. आजही गोंदूर मधील अनेक घरात राम सुतार यांनी घडविलेल्या गौरांया आहेत. गावकरी सुद्धा मोठ्या स्वाभिमानानें सांगतात कीं, आमच्या घरात राम सुतार यांच्या हाताने घडवीलेली गौरांई आहे.
      गोंदूर गावातून दीड फुटाची लाकडी गौरांई तें गुजराथ मधील जगातील सर्वात उंच सरदार पटेल यांचा 182 मिटर म्हणजे 597 फुटाचा ब्रांझचा पुतळा हां प्रवास राम सुतार यांचा आहे. जगातील सर्वं शिल्प या दीड फुटाची गौरांई तें 597 फुटाचा स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्या मधली शिल्पे आहेत. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी उंच आहे.


        वेरूळ अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी खान्देश आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या अहिराणी भाषिक सोयगाव आणि कन्नड तालुक्यात आहेत. त्यामुळे त्या लेण्या खांदेशातचं आहेत. दोन हजार वर्षा पूर्वी तयार झालेल्या या लेण्यातील चित्र आणि शिल्प यात अहिराणी भाषिक अहिराचा मोठा सहभाग असला पाहिजे. तेच अहिरी रक्त राम सुतार यांच्या धमण्यात वहात आहे. वेरूळ अजिंठा घडविणारेचं हात त्यांना वारसा हक्काने मिळाले आहेत. म्हणून तर सरकारनें राम सुतार यांच्याकडे वेरूळ अजिंठा येथील फुटलेल्या मुर्त्या दुरुस्त करण्याच काम सोपल होतं. राम सुतार यांनी तें काम अत्यंत कसबीने बनवलं. मूळ मूर्ती मूळ रूपात त्यांनी उभ्या केल्या आहेत.


        त्यांचं कर्तृत्व पाहून भारत सरकारनें पद्मभूषण पुरस्कारानें त्यांचा गौरव केला आहे. उद्या कदाचित भारत सरकार त्यांना भारत रत्नही देईल. पण महाराष्ट्र सरकार कांय? महाराष्ट्र राम सुतार यांचा सन्मान करणार आहे कीं नाही? राम सुतार यांना राज्य सरकारनें महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे असं मला वाटत.
       मला वाटत तेंचं प्रत्येक खान्देशी व्यक्तीला वाटलं पाहिजे. त्यांनी आपल्या आमदार खासदारा कडे ही मागणी केली पाहिजे. आपल्या आमदार खासदारांनी ती सभागृहात मांडली तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सहज मिळेल. त्यांचा तो अधीकार आहे!
        राम सुतार आणि छ शिवाजी महाराज यांची जन्म तारीख एकच आहे. 19 फेब्रुवारी 2024 ला राम सुतार 99 वर्ष वयाचे झाले आहेत. पुढच्या वर्षी म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 लां राम सुतार यांनी वयाची शंभरी गाठली असेल. त्या दिवशी महाराष्ट्र शासनानें या खान्देशी अहिर पुत्राला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांची शतायुषी साजरी करावी ही विनंती!
बापू हटकर
 

अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

Khandeshi Ahirani Blogs

राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?

खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्का

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

कान्हदेशी विविध बोली लेखपट

1 thought on “खान्देश कला रत्न राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण द्या!”

Leave a Comment