उद्घाटन
ग्लोबल खान्देश महोत्सव दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन संपन्न दिनांक 2-3-2024
ग्लोबल खान्देश महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन संपन्न
कल्याण ऐतिहासिक, व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट , सुंदर , स्वच्छ कल्याणनगरीत दि.२ मार्च,२०२४ ते दि.५ मार्च २०२४ या चार दिवशी दररोज संध्याकाळी ६.०० ते रात्री १०.०० यावेळेत फडके मैदान,लाल चौकी कल्याण(प) येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याचे अत्यंत दिमाखदार व दैदिप्यमान स्वरुपात उद्घाटन संपन्न झाले.




खान्देश महोत्सवाचे महत्व
या उद्घाटनप्रसंगी विकास पाटील यांनी ग्लोबल खान्देश महोत्सव हा लोकल ते ग्लोबल हा प्रवास विषद केला.स्वागताध्यक्ष श्री नरेंद्र सूर्यवंशी यांनी खान्देश महोत्सवाचे महत्व सांगीतले.व्यक्त माननीय माजी आमदार ,श्री नरेंद्र पवार यांनी त्यांच्या मनोगतात खान्देश आणि कोकण यांचे ऋणानुबंध कसे अतुट जुळले आहेत व खान्देशी माणूस प्रचंड सकारात्मक असतो असे सांगितले.तर वरून पाटिल यांनी मी खान्देश वासिया सोबतच काय काय गोष्टी शिकलो हे सांगीतले. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी मा. श्री. जयंत पाटील यांना खान्देशश्री पुरस्कार देण्यात आला.ग्लोबल खान्देश महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन संपन्न
खान्देश ग्लोबल महोत्सव संस्कृती संवर्धन
खान्देश ग्लोबल महोत्सव म्हणजे खान्देशवासियांच्या रूढी परंपरा , संस्कृती जपण्याचे साधन. जे खान्देश सोडून कल्याण , ठाणे मुंबई परिसरात कामधंदा , नोकरीसाठी स्थायिक झाले आहेत त्यांची नाळ आपल्या खान्देशशी जोडण्याचे कार्य म्हणजे खान्देश ग्लोबल मह़ोत्सव. असे मनोगत प्रदेश सरचिटणीस भाजपा माधवी ताई नाईक यांनी व्यक्त केले.या प्रसांगी भरतजी गडे, प्रशांत पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
खान्देश महोत्सव सोहळ्यातील कार्यक्रम
या महोत्सवातील सांस्कृतिक कलामंचवर खान्देशी कलाकारांचं सुरेल व सुरेख गायन,शालेय विद्यार्थ्यांचे बहारदार नृत्य हे विशेष वाखाणण्याजोगे होते. स्टेजवरील चित्ताकर्षक व मनोवेधक डिजीटल स्क्रीन,भव्यदिव्य राम मंदिर प्रतिकृती, राममंदिर प्रतिकृतीने कल्याणकरांचे मन जिंकले.
खान्देशी खाद्य संस्कृती
मनोरंजनासाठीचे झुले,पाळणे त्याचप्रमाणे वेज,नॉनवेज खाद्यानाची स्टॉल,गरमागरम जिलेबी,तळलेली व भाजलेले पापड,कंदी पेढे, खापरची पुरणपोळी, कळण्याची भाकरी,थालीपीठ, मिसळ पाव,झुणका भाकर,ठेचा,चटणी,मसाल्याचे पदार्थ,अन्नधान्य व कडधान्य यांची शंभराहून अधिक स्टॉल खवैय्यासाठी मेजवानीच होती.
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थिती
या प्रासंगी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील,कार्याध्यक्ष बापुसाहेब हाटकर,उपाध्यक्ष एल.आर.पाटील,प्रदिप अहिरे, प्रकाश माळी , दिगंबर बेंडाळे खजिनदार अप्पासाहेब ए.जी.पाटील, सुनील चौधरी संजय बिलाले, सुभाष सरोदे,अमोल बोरसे,,मुंबई ज्युनिअर कॉलेज एम्लाईज सोसायटीचे सचिव विशाल बावा सर, मिंलिद बागूल, प्रकाश पाटील ,सुधाकर भामरे.
मनोहर भामरे,कल्याण विभागप्रमुख प्रभाकर बोरसे , जगदीश पाटील, विनायक संन्यासी,निलेश महाजन, यशमहाजन, सुनील पाटील, भांमरे सर , योगेश सोनवणे,,डी व्ही पाटील, सतीश पाटील, अनिरुद्ध चव्हाण,सुनील पाटील, , भूषण चौधरीअहिरराव सर,प्रकाश माळी,रवींद्र शिंपी ,सौ हेमलता देसले , सौ सुनीता बोरसे, आशा भामरे, सुनंदा वाघ, निता पाटील,सौ चेतना भालेराव, विजय पाटील, विनोद शिंदे, योगिता सोनवणे,श्रीरंग अत्रे, आशा वाडिले, दिपाली चव्हाण, यांच्या उपस्थितीत संस्मरणीय व ऐतिहासिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
सूत्रसंचालन
विनोद शेलकर,सौ.वर्षा पाटील व कु.वैदेही पाटील यांचं बहारदार,दमदार व कसदार सूत्रसंचालन कार्यक्रमाची उंची वाढविणारं व मंत्रमुग्ध करणारं होतं…!
1 thought on “ग्लोबल खान्देश महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन संपन्न 2-3-2024”